यशवंतराव चव्हाण हायस्कूल मध्ये महात्मा फुले पुण्यतिथी साजरी
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले

यशवंतराव चव्हाण हायस्कूल मध्ये महात्मा फुले पुण्यतिथी साजरी
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क (वृत्तसंस्था)
छत्रपती संभाजी नगर:आज 28 नोव्हेंबर 2024 रोजी यशवंतराव चव्हाण हायस्कूल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सत्यशोधक समाजाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. ओमप्रकाशजी शिंदे सर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री ढाके एम. ए.हे होते. तर प्रमुख अतिथी मा. श्री घोरपडे डी. आर. हे होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पर्यवेक्षक मा. श्री घोरपडे सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले* यांचे शैक्षणिक कार्य , स्त्री शिक्षणाची चळवळ याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री महेंद्र ढाके. यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन स्वतःला विद्वान समजणाऱ्या विशिष्ट घटकांच्या विरोधात जाऊन समाज सुधारण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. स्त्री शिक्षणाचे कार्य, प्लेग मधील कार्य आणि शेतकऱ्यांनी साठी लिहिलेला “शेतकऱ्यांचा आसूड” याविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ देसले एम. ए. तर आभार सौ होले आर. बी.यांनी व्यक्त केले.
फलक लेखन श्री.घुशिंगे जी. आर.यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
