
दिव्यांगानी बजावला मतदानाचा हक्क , 591 जणांनी केले मतदा
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज फुलंब्री प्रतिनिधी अमोल कोलते
फुलंब्री:१०६ फुलंब्री विधानसभा मदारसंघामध्ये दिनांक 13 नोव्हेंबर पासून आज पर्यंत एकुण 591 मतदारांनी होम वोटींग द्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे. ८५ वर्षा पेक्षा अधिक वयाचे एकुण 526 मतदारांनी मतदान केले.
65 दिव्यांग मतदारांनी मतदान केले. आज फुलंब्री मतदार संघामध्ये होम वोटींगचा तिसरा दिवस होता. बोधेगाव बु, बोधेगाव खु, वावना, सोनारी बु., पाथ्री, वाघलगाव, भालगाव, भावडी, महालकिन्होळा, वडोद बाजार, जातेगाव, धामणगाव, गेवराई गुंगी, निमखेडा, सताळा बु, बोरगाव अर्ज , जळगाव मेटे, गणोरी, कान्होरी, म्हसला, बाभुळगाव तरटे, लोहगड नांद्रा, फुलंब्री, दरेगाव दरी, गाढेजळगाव, करंजगाव, सताळा, सावंगी, भिकापुर, करमाड, दुधड, पिंपळखुटा, जडगाव, हिवरा, टोनगांव, गोलटगांव, निपाणी, चिंचोली, परदारी, टाकळी वैद्य या गावांमध्ये एकोणावीस पथकाद्वारे मतदान घेण्यात आले. अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी ब्रिजेश पाटील , सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी कृष्णा कानगुले यांनी दिली.
