फुलंब्री तालुक्यातील राहिलेले कामे पूर्ण करण्यासाठी प्रहारचे गटविकास अधिकारी पंचायत समिती फुलंब्री यांना निवेदन

फुलंब्री तालुक्यातील राहिलेले कामे पूर्ण करण्यासाठी प्रहारचे गटविकास अधिकारी पंचायत समिती फुलंब्री यांना निवेदन
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था
फुलंब्री तालुक्यातील सर्व राहिलेले कामे वयक्तिक रोजगार हमी योजनेचे कामे यांना चालू करण्यासाठी परवानगी मिळावी जसे की, 2024- 25 या वर्षातील वैयक्तिक कामे गाय गोठा,विहीर,फळबाग शेततळे यांना तात्काळ चालू करण्यासाठी आपल्या स्तरावर परवानगी मिळणे बाबत. व शेतकऱ्यांची होत असलेली शासनाकडून फसवणूक तात्काळ रोखण्यासाठी जे काम मंजूर झालेले असतील त्यांना कामे करण्यासाठी परवानगी द्यावी. अन्यथा कार्यालयासमोर येत्या दि26 /5/2025या रोजी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल या आंदोलन वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्व जिम्मेदारी फुलंब्री पंचायत समिती कार्यालयाची राहील अशा आशयाचे निवेदन देउन आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कर्ते
कृष्णा गाडेकर प्रहार युवा जिल्हाध्यक्ष सुदाम गायकवाड उपजिल्हाध्यक्ष मच्छिंद्र जंजाळ तालुका अध्यक्ष रामू खाकरे तालुका अध्यक्ष रावसाहेब खिल्लारे कार्याध्यक्ष दिलीप शिंदे तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब जंगले ,प्रभाकर आढाव ,अमोल कोलते ,गणेश सूरभय्ये विठ्ठल ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती.
