सामाजिक

संविधानवादी मोर्चा तर्फे  पॅथर नेते विजय वाकोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 

संविधानवादी मोर्चा तर्फे  पॅथर नेते विजय वाकोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क

छ्त्रपती संभाजी नगर:आज डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ गेट समोर आंबेडकरी चळवळीतील पॅथर नेते विजय वाकोडे यांचे नुकतेच निधन झाले होते त्याना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन संवीधानवादी मोर्चाचे संयोजक सय्यद तौफीक यांनी केले होते या वेळी दलीत पॅंथरचे प्रदेश अध्यक्ष संजय जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती विजय वाकोडे यांनी आंबेडकरी चळवळीत विविध मोर्चे-आंदोलने उभारुन रस्त्यावर येऊन नामांतर लढ्यात त्याची महत्वाची भुमिका होती तसेच दलीत मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील लोकांना त्यानी न्याय देण्याचे काम केले या श्रद्धांजलीच्या वेळी आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या वेळी आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरवादी कार्यकर्ते व ने़त्यासह कम्युनिस्ट पक्षाचे शहर सरचिटणीस नेते अभय टाकसाळ बंजारा समाजाचे नेते तोताराम जाधव आमीनभाई जामगावकर मौलाना गुफरान मौलाना मुफ्ती मसुदभाई मौलाना हाफीज अरुण शिरसाट अफजल शेख जमील शेख किशोर गडकर सादीक शेख जफर मिलीद वानखेडे नागेश केदारे किरण पंडित आनंद दाभाडे आंनद काळे वसीम पठाण समीर पठाण इरफान पठाण मुस्तफा शेख पाशु मिर्झा मनिष पवार रोहित बचके साहिल जाधव वैभव हिवराळे शेख मतीन कुणाल वारे आकरम पठाण रणाजित वायसे यांची या वेळी उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close