
दहावी-बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी आनंदाची बातमी
महसूल विभागाचा जनहितार्थ महत्त्वपूर्ण निर्णय!
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासाठी लागणारे ₹५०० मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांचा आर्थिक भार कमी होणार आहे.
प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली असून, आता फक्त स्वसाक्षांकित अर्जावर ही कागदपत्रे सहज उपलब्ध होतील. विशेषतः दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा निर्णय दिलासा देणारा आहे. तसेच, शासकीय योजनांचा लाभ घेणेही सोपे होणार आहे.
महसूल मंत्री ना.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी तातडीने अंमलबजावणीचे निर्देश दिले आहे.
