
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी
▪️वडिलांच्या आठवणीने वैभवीची आर्त हाक, धनंजय देशमुखांचा न्यायासाठी संघर्ष
▪️संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
▪️मनोज जरांगेंचा मेहुणा विलास खेडकरसह 9 जणांवर वाळू तस्करीप्रकरणी तडीपारीची कारवाई, जालन्यात प्रशासन अॅक्शन मोडवर
▪️महादेव मुंडे प्रकरणाचा तपास तात्काळ SIT किंवा CID द्या अन्यथा आमरण उपोषण करणार, पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा प्रशासनाला इशारा
▪️ठाकरे गटाचे राजन साळवी 13 फेब्रुवारीला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा, पण सामंत बंधुंचा विरोध कायम असल्याची माहिती
▪️आई-वडिलांच्या किरकोळ वादात मुलांचा बळी, जन्मदातीनेच गळा दाबून दोन मुलांना संपवलं
▪️गेल्या नऊ महिन्यात तब्बल 183 नक्षलींचा खात्मा; छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर नक्षलींचा बिमोड सुरुच
▪️मुलीच्या निर्घृण हत्येनंतर डिप्रेशनमध्ये, शेवटची इच्छाही अधुरीच राहिली; श्रद्धा वालकरच्या वडिलांनी घेतला अखेरचा श्वास
▪️पाकिस्तानच्या गुप्तचर खात्यासाठी हेरगिरी करणाऱ्या संदीप सिंहला अटक, नाशिक येथील आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये होता कार्यरत
▪️पाकिस्तानच्या मैदानातील सदोष लायटिंगमुळं नजर हटली, न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्र रक्तबंबाळ, गमावला असता डोळा
