श्री गुणेश्वर महाराज गाडेकर यांच्या हस्ते श्री त्रिनेत्रेश्वर महादेवाची स्थापना
पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

श्री गुणेश्वर महाराज गाडेकर यांच्या हस्ते श्री त्रिनेत्रेश्वर महादेवाची
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी:विशाल जोशी गंगापूर
गंगापूर तालुक्यातील पेंढापूर खैरगव्हाण लोणकर वस्ती येथे श्री त्रिनेत्रेश्वर महादेवाची स्थापना करण्यात आली.
श्री गुणेश्वर महादेव प्रतिष्ठानचे मठाधिपती श्री गुणेश्वर गाडेकर महाराज यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यात नवतरुणांना व्यसनांपासून दूर ठेवून रंजल्या गांजल्यांना भक्तीच्या मार्गातून साधनेच्या मार्गातून महाराजांचा भक्तांना आशीर्वाद मिळत आहे महाराजांचे ठिकठिकाणी भेटीगाठी कार्यक्रम होत आहेत अशातच गंगापूर तालुक्यातील पेंढापूर खैरगव्हाण लोणकर वस्ती येथे श्री त्रिनेत्रेश्वर महादेवाची स्थापना करण्यात आली.
यावेळी मोठ्या जल्लोषात संत पूजन करण्यात आले यात भजनी मंडळी, टाळकरी मृदुंग आदी वाद्यांमध्ये भाविक भक्त आनंदी पहायला मिळाले. या स्थापणेसाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
