राज्यशैक्षणिक

प्रतीक्षा संपली,उद्या दुपारी 1 वाजता 10 वी चा निकाल जाहीर होणार..

📚 प्रतीक्षा संपली,उद्या दुपारी 1 वाजता 10 वी चा निकाल जाहीर होणार…

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क 

Maharashtra SSC Board Result 2025: पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत https://sscresult.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close