फ्रेंडशिप डे का साजरा केला जातो ? मैत्री दिनाचा रंजक इतिहास जाणून घ्या.
कायम आपल्यासाठी एक प्रेरणा म्हणून उभा असतो तोच आपला खरा मित्र.

🤝 फ्रेंडशिप डे का साजरा केला जातो ? मैत्री दिनाचा रंजक इतिहास जाणून घ्या
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
🔸 कोणत्याही नात्यापेक्षा मैत्रीचे नाते अतिशय खास असते. याच नात्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यंदा 3 ऑगस्ट रोजी जगभरात Friendship Day 2025 साजरा केला जाणार आहे.
🔸 फ्रेंडशिप डे ची सुरुवात यूएसए मधून झाली. मुळात ही संकल्पना 1930 मध्ये अमेरिकेतील हॉलमार्क कंपनीने मांडली होती. ग्रीटिंग कार्ड बनवणारी कंपनी हॉलमार्क, आपले कार्ड विकले जाण्यासाठी फ्रेंडशिप डे ची संकल्पना आणली पुढे जाऊन 1958 मध्ये या संकल्पनेबद्दलचा प्रस्ताव पराग्वे देशाने मांडला. आज जागतिक मैत्री दिवस म्हणून ओळखला जातो.
🔸 आयुष्यात आपल्याला पावलापावलावर मित्रांची गरज भासते. मग ते आनंद असो किंवा काही दुःखाचे क्षण! प्रत्येक अडीअडचणीला धावून येणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा मित्रच असतो. आपल्या अपयशा वेळी आपल्याला धीर देत असतो आणि कायम आपल्यासाठी एक प्रेरणा म्हणून उभा असतो तोच आपला खरा मित्र.
