Travelसामाजिक

अतिक्रमणाच्या दणक्याने ‘ गोल’वाडी झाली सरळ…!;पक्के अतिक्रमण जमीनदोस्त

मोहीम गोलवाडीफाटा ते जुने कायगावपर्यंत संपूर्ण अतिक्रमण जमिनदोस्त होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले

अतिक्रमणाच्या दणक्याने ‘ गोल’वाडी झाली सरळ…!;पक्के अतिक्रमण जमीनदोस्त

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी: राजू जंगले वाळूज महानगर 

संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील गोलवाडी ते पंढरपूर गावापर्यंत अतिक्रमणांच्या रांगेवर प्रशासनाने आज, २७ फेब्रुवारीला सकाळपासून बुलडोझर फिरवायला सुरुवात केली. रस्त्याच्या बाजूलाच वस्तू घेऊन बसलेले विक्रेते, टपऱ्या, हॉटेल्स, छोट्यामोठ्या विक्रेत्यांची दुकाने भुईसपाट करण्यात आली. या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांत खळबळ उडाली आहे. सायंकाळपर्यंत २५ छोटीमोठी आणि २ पक्की बांधकामे केलेली अतिक्रमणे हटविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

प्रादेशिक परिवहन मंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते, जागतिक बँक प्रकल्प व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ही धडक मोहीम सुरू करण्यात आली असून, ती कायगावपर्यंत राबवली जाणार आहे. अतिक्रमणधारकांना २०

दिवसांपूर्वीच अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे आज सकाळी साडेअकरापासून अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. अतिक्रमण हटाव पथक हे जेसीबी, हायवा व अधिकाऱ्यांच्या टीमसह टनास्थळी दाखल होताच अतिक्रमणधारकांत धावपळ उडाली.

अधिकाऱ्यांनी छोट्या दुकानदारांचे सामान काढून घेण्यास वेळ दिला.मात्र पक्के अतिक्रमण मात्र जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.

 वाढत्या अपघातांमुळे धडक कारवाई…

पंढरपूर, वाळूजमधून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर -पुणे महामार्गावर गोलवाडी फाटा ते कायगावपर्यंत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी होत आहेच, शिवाय अपघातही वाढल्याने प्रशासनाला रोषाला सामोरे लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते नितीन राऊत यांनी केलेल्या पाठपुराव्यमुळे अखेर प्रशासन अॅक्शनवर उतरले.

राज्याचे अप्पर पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन मंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते, जागतिक बँक प्रकल्प व पोलीस प्रशासन यांनी आधी अतिक्रमणांची पाहणी केली. त्यानंतर सर्वांना नोटिसा बजावल्या. आज प्रत्यक्ष अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यास सुरुवात झाली.

साडेसातमीटरपर्यंत रस्ता झाला मोकळा…

आज गोलवाडी फाटा ते पंढरपूरपर्यंत कारवाई करत दुभाजकापासून साडेसात मीटरपर्यंत रस्ता मोकळा करण्यात आला. हा मार्ग ६६ फुटांचा असून दोन्ही बाजूंनी ५० फुटापर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पथकात जागतिक बँक प्रकल्पचे कनिष्ठ अभियंता हरिष गर्जे, कांचन पडवळ, कनिष्ठ अभियंता अक्षय तांदळे, अभिजित चौधरी, राजू पाचपुते, गणेश राऊत, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोडके (वाहतूक), एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे जयकिशन चौथे, मंगेश मनोरे यांच्यासह चार होमगार्डचा समावेश होता. ही मोहीम गोलवाडीफाटा ते जुने कायगावपर्यंत संपूर्ण अतिक्रमण जमिनदोस्त होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close