सामाजिक

महानगरपालीका घेत आसलेली १२.५५ हेक्टर जमनी सोडुन ऊरवरित अतिक्रमीत क्षेत्र आतिक्रमन धारकांच्या नावावर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन

महानगरपालीका घेत आसलेली १२.५५ हेक्टर जमनी सोडुन ऊरवरित अतिक्रमीत क्षेत्र आतिक्रमन धारकांच्या नावावर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी राजू जंगले वाळूज 

निवासी जिल्हाधिकारी. श्री. विनोद खिरोळकर व मनपा आतिरिक्त आयुक्त -1 मा. श्री. रंजित शिंग पाटिल. यांना समक्ष भेटुन चर्चा करुन निवेदन देन्यात आले. विषय मोजे तिसगाव ता. जि. छ संभाजी नगर येथे शासकीय गायरान जमीन गट न. २२७/१ मधील ऐकून ८६.२५ हेक्टर पैकी महानगर पालिका फक्त १२.५५ हेक्टर क्षेत्र पंतप्रधान ग्रह प्रकल्पा साठी उपयोगात घेणार असल्याचे पत्र महानगर पालिकेने आम्हाले असून ते क्षेत्र अतिक्रम विरहित ( वगळून ) आहे करिता सदर गट. न. मधे स्वकष्टाने पक्के घरे बांधून राहत असलेल्या सर्वे जाती धर्मातील मजूर व कष्टकरी वर्ग अंदाजित १००० ते १२०० घरे यांना नमुना न. ८ अ व पी आर कार्ड देण्यात यावे आशि निवेदना द्वारे नम्र विनंती करन्यात आली आसुन खालील मांगण्या मांडल्या आहेत.

१) सादर गट न. २२७/१ मधील १.२५ हेक्टर हे क्षेत्र गावठाण विस्तारासाठी उपलब्ध असून त्या क्षेत्रात सध्यास्थितीत असलेल्या लोकसंखे प्रमाणे वाढ करून त्या क्षेत्राच्या सीमारेषा कायम करणे किंवा गट विभागणी करणे.

२) गट न. २२७/१ मधील अतिक्रमण धारकांची सर्वे करून शासकीय नोंद करून घ्यावी.

३) शासन निर्णय क्रमांक :- संकीर्ण -२०१९/प्र.क्र.१५/नवी-२६ दि. ०८ मार्च २०१९ गावठाण व शासकीय जमिनी वरील निवासी अतिक्रमणे नियामाकुल करणे या प्रमाणे व ग्राम सभा दि. ०७/०२/२०२५ विषय क्रमांक ०७ व ठराव क्रमांक ७/१ अतिक्रमित वस्ती नियामाकुल करुन नमुना न. ८ अ व पी आर कार्ड देण्यात यावे.

४) वरील मागणीसाठीच्या पुढील कार्यवाही साठी ग्रामपंचायत कडे प्रस्ताव सदर करण्याचे समंधित विभागास आदेशित करावे. सामाजिक कार्यकरते आरुनभाऊ पठारे यांच्या मार्गदर्शनात निवेदन देन्यात आले तेव्हा सुनिलभाऊ जोगंदड, शशिकांत गोफणे, रमेश दाभाडे, रावसाहेब खरात व भगवान रायकर आदि नागरिक उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close