
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी
▪️राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षांच्या मदतीबाबत प्रश्न अन् भाजपच्या भूमिकेवर नाराजी,अजित पवारांसमोर उमेदवारांनी अडचणी मांडल्या
▪️विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती होणार,नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार
▪️पिंपरी-चिंचवडमधील तब्बल 42486 महिला लाडकी बहीण योजनेतून ठरल्या अपात्र
▪️रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सलग 11 व्यांदा रेपो रेट जैसे थे,वाहन खरेदी कर्ज, गृह कर्जदारांची यावेळीही निराशा
▪️काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवींच्या बाकाखाली नोटा सापडल्या,राज्यसभेतील गोंधळात सत्ताधारी विरोधक आमने सामने
▪️मंत्रिमंडळ विस्ताराबाबत घडामोडींना वेग; आज राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक, अजित पवार,सुनील तटकरे अन् प्रफुल पटेल यांच्यात तासभर खलबतं
▪️रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कृषी कर्जाची मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली, कोणत्याही हमीशिवाय शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज
▪️दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू मिळण्याची शक्यता, मंत्रिपद देताना एकनाथ शिंदे कठोर निर्णय घेणार असल्याच्या चर्चा
▪️राज्यावर अवकाळी पावसाचं संकट; छत्रपती संभाजीनगर, लातूर, सिंधुदुर्ग, नाशिकमध्ये पावसाची हजेरी, पिकांच्या नुकसानामुळं शेतकरी चिंतेत
▪️ ॲडिलेडच्या पिंक बॉल कसोटीत भारत पहिल्या डावात 180 धावांवर बाद, गोलंदाजांच्या माऱ्यापुढं भारताची फलंदाजी ढेपाळली
