राजकिय

महायुतीचे उमेदवार विलास भुमरे शक्तिप्रदर्शनाने आज करणार उमेदवारी अर्ज दाखल

"विश्वास जुना, भुमरेच पुन्हा" असा निर्धार यावेळी शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यानी व्यक्त केला.

महायुतीचे उमेदवार विलास भुमरे शक्तिप्रदर्शनाने आज करणार उमेदवारी अर्ज दाखल

लाखो समर्थक होणार सहभागी ; पैठण विधानसभा मतदार संघात महायुतीचा झंजावात

खासदार संदीपान भुमरे यांची राहणार विशेष उपस्थिती

“विश्वास जुना, भुमरेच पुन्हा” चा कार्यकर्त्यांचा निर्धार

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : धनंजय लाखुळकर ११०-पैठण विधानसभा मतदार संघ, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आर-पी-आय (आ), अखिल भारतीय क्रांतिसेना व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार विलास संदीपानराव भुमरे हे आपल्या लाखो समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत मंगळवारी (दि. २९) आपला अधिकृत उमेदवारी दाखल करणार असुन पैठण विधानसभा मतदार संघातील मतदारांनी मोठ्या संख्येने पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सकाळी १० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगर लोकसभा खासदार संदीपान भुमरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. 

काम हीच ओळख हे ब्रीद घेऊन महायुतीचे सरकार विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात पैठण मतदार संघात गेली ३५ वर्ष खासदार संदीपान भुमरे भरघोस विकास कामे केली आहेत. याच विकासकामांच्या जोरावर मतदारांचे आशीर्वाद घेत ११०-पैठण विधानसभा मतदार संघ, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आर-पी-आय (आ), अखिल भारतीय क्रांतिसेना व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार विलास संदीपानराव भुमरे यांनी पैठण विधानसभा मतदार संघाला प्रगती पथावर नेण्यासाठी शाश्वत विकासाचा संकल्प केला आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हजारो तरुणांनी महायुतीच्या विविध मेळाव्यात जाहीर प्रवेश करत उमेदवार विलास संदीपान भुमरे यांचे हात बळकट केले आहे. पैठण मतदार संघात शिवसेनेचा हा बालेकिल्ला अभेद्य राहण्यासाठी आणि धनुष्यबाण या निशाणी समोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचा आणि “विश्वास जुना, भुमरेच पुन्हा” असा निर्धार यावेळी शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यानी व्यक्त केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close