गुलमोहर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेतर्फे 79 वा स्वातंत्र्य दिवस जल्लोषात साजरा….

गुलमोहर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेतर्फे 79 वा स्वातंत्र्य दिवस जल्लोषात साजरा….
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था छ्त्रपती संभाजीनगर
ग्रीन ग्लोब विद्या मंदिर, देवळाई येथे गुलमोहर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेतर्फे 79 वा स्वातंत्र्य दिवस जल्लोषात साजरा….
गुलमोहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्रीन ग्लोब विद्या मंदिर, देवळाई परिसर छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना पवार मॅडम उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती वसुधा कल्याणकर जिल्हा सचिव व राज्यसहसचिव भारतीय महिला फेडरेशन या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती दाभाडे मॅडम उपस्थित होत्या. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीत गायन केले तसेच भाषण व नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी आपले देशाविषयीचे प्रेम व्यक्त केले. प्रमुख अतिथी नि आपल्या भाषणातून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक क्रांतिकारीला अभिवादन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना पवार यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदाचे सहकार्य लाभले.
