शैक्षणिक
गुलमोहर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचा स्थापना दिवस साजरा
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांचे सहकार्य लाभले.

गुलमोहर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचा स्थापना दिवस साजरा
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर:गुलमोहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्रीन ग्लोब विद्या मंदिर, देवळाई परिसर छत्रपती संभाजी नगर, येथे संस्थेचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक कै. विश्वासराव दाभाडे पाटील साहेब यांचा जन्मदिवस हा ‘स्थापना दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती दाभाडे, सचिव डॉ. ऋषिकेश दाभाडे, श्री आळंजकर साहेब, श्री नवले सर , विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना पवार यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.गायत्री मुंजाळ आणि कु. कल्याणी केसभट या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांचे सहकार्य लाभले.
