सामाजिक

श्री गुणेश्वर महादेव प्रतिष्ठान येथे महाशिवरात्री निमित्त गुरुशिष्य मेळावा उत्साहात…

महाशिवरात्री निमित्ताने अनेक ठिकाणचे साधू संत महंत भाविक भक्त मान्यवरांची उपस्थिती दिसून आली.

श्री गुणेश्वर महादेव प्रतिष्ठान येथे महाशिवरात्री निमित्त गुरुशिष्य मेळावा उत्साहात…

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी:नारायण महाराज बांबर्डे मारसावळी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील मारसावळी या ठिकाणी श्री गुणेश्वर प्रतिष्ठान येथे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नित्यनियमानुसार सकाळी होम,अभिषेक, महाआरती झाली आज महाशिवरात्री निमित्ताने गुरुशिष्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यात भगवान शंकराचे महत्त्व …

भक्ती कशी करावी…?

पूजा करण्याची पद्धती …

पूजा करतांना घ्यावयाची काळजी

धार्मिक पावित्र्य राखणे

अशा अनेक मुद्यावर मठाधिपती शिवभक्त श्री गुणाजी महाराज गाडेकर यांचे महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांना गुरुशिष्यांना लाखमोलाचे मंत्रमुग्ध करणारे अनमोल असे मार्गदर्शन मिळाले त्यानंतर प्रसादाने मेळाव्याची सांगता करण्यात आली.

यावेळी हजारोच्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती शिवाय महाशिवरात्री निमित्ताने अनेक ठिकाणचे साधू संत महंत भाविक भक्त मान्यवरांची उपस्थिती दिसून आली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close