बिझनेससामाजिक

हे केले नाही तर.. 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन कार्ड बंद! बँक व्यवहारांपासून टॅक्सपर्यंत सर्व कामं रखडणार

अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक प्रकारच्या अनेक अडचणी येतील.

 🏦 Bank व्यवहारांपासून टॅक्सपर्यंत सर्व कामं रखडणार

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था 

नवी दिल्ली: भारत सरकारनं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य केलं आहे. टॅक्स सल्लागार मंच टॅक्सबडीनं यासंदर्भात सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन इशारा दिला आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पॅनला आधारशी न जोडल्यास तुमचं पॅन कार्ड १ जानेवारी २०२६ पासून निष्क्रिय होईल.

टॅक्सबडीनं दिलेल्या माहितीनुसार, ‘तुमचं पॅन कार्ड १ जानेवारी २०२६ पासून निष्क्रिय होईल. तुम्हाला ना प्राप्तिकर भरता येईल ना रिफंड मिळेल. इतकंच काय तर पगार बँक खात्यात जमा होणं किंवा SIP वरही याचा परिणाम होऊ शकतो.’ कर क्षेत्रातील तज्ज्ञांनी लवकरात लवकर पॅन आणि आधार लिंक प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार आणि करांशी संबंधित कामं सुरळीत सुरु राहतील.

पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत सरकारनं अनेकदा वाढवली आहे. पण आता यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ची मुदत निश्चित करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा ही मुदत वाढण्याची शक्यता अतिशय कमी आहे.

पॅन आणि आधार लिंक करणं कोणकोणाला अनिवार्य?

अर्थ मंत्रालयानं ३ एप्रिल २०२५ रोजी एक अधिसूचना काढली. त्यानुसार १ ऑक्टोबर २०२४ च्या आधी ज्यांना आधार अर्जासाठी एनरोलमेंट आयडीच्या आधारे पॅन कार्ड जारी करण्यात आलेलं आहे, त्यांना आपला आधार नंबर ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत प्राप्तिकर विभागाला कळवावा लागेल. याचा अर्थ जर तुम्ही आधार एनरोलमेंट आयडीच्या माध्यमातून पॅन तयार केलेलं असेल, तर आधार नंबर मिळाल्यानंतर पॅन कार्ड आधारशी लिंक अनिवार्य आहे. मग भले तुम्ही पॅन आधी तयार केलेलं असेल. प्राप्तिकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर ही प्रक्रिया ऑनलाईन होते.

पॅन-आधार लिंक न केल्यास काय होणार?

३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पॅन-आधार लिंक पूर्ण न केल्यास १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल. अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक प्रकारच्या अनेक अडचणी येतील.

– तुम्हाला प्राप्तिकर भरता येणार नाही.

– टॅक्स रिफंड मिळणार नाही

– TCS/TDS ची माहिती फॉर्म 26AS मध्ये दिसणार नाही

– TDS/TCS अधिक प्रमाणात कापला जाईल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close