शैक्षणिक

अजून हिंदू संस्कॄती जिवंत आहे–“अर्चना बोरडे 

अनेक महिला शिक्षिकांची उपस्थिती

अजून हिंदू संस्कॄती जिवंत आहे–“अर्चना बोरडे 

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज वृत्तसंस्था 

कोण म्हणतं हिंदू संस्कॄती लोप पावत चालली आहे पाशात्य संस्कॄतीचा जरी आपल्यावर प्रभाव पडत असेल तरी आपली भारतीय संस्कॄती व पुरातन सण उत्सव आजही मोठ्या दिमाखात साजरे केले जातात त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे हळदी कुंकूचा कार्यक्रम 

…आज स्वामी विवेकानंद विद्यालय व रामेश्वर इंग्लिश स्कूल शाळेत महिला शिक्षिकांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला या कार्यक्रमा प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना सहशिक्षिका श्रीमती अर्चना बोरडे म्हणाल्या की सद्यः सगळीकडे महिला वर्ग हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करताना आपल्या नजरेस पडतात नेमका हळदी कुंकवाचा कार्यक्रम का आणि कसा साजरा केला जातॊ त्यावर आज मी थोडक्यात एक कटाक्ष टाकत आहे संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत च्या दरम्यान एक योग्य दिवस निवडुन

संपूर्ण घर स्वच्छ करुन जर तुम्हाला आवडत असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एखाद्या थीम प्रमाणे तुमच्या घराला सजवू शकता. 

हळदी कुंकू निमित्ताने एखादी छान रांगोळी काढून येणाऱ्या सुवासिनींना बसण्यासाठी योग्य व्यवस्था केली जाते 

त्यांच्यासाठी चहा आणि नाश्त्याची पूर्वतयारी करून ठेवावी लागते त्यामुळे वेळेवर आपली धावपळ होत नाही. 

ताट सुंदर सजवून त्यामध्ये हळदी कुंकू ठेवावे, तसेच सुवासिनींना देण्यासाठी तिळगुळ किंवा तिळाचे लाडू ठेवावे.

सुवासिनींना देण्यासाठी आणलेले वाण म्हणजेच भेटवस्तू याची व्यवस्थित मांडणी करून ठेवावी लागते 

घरातील सर्व तयारी झाल्यानंतर एक योग्य वेळ ठरवून त्या वेळेला सर्व सुवासणींना हळदीकुंकवाला येण्यासाठी आमंत्रण द्यावे.लागते 

सुवासिनी आल्यानंतर सर्वप्रथम त्यांना चहा आणि नाश्ता झाल्यावर 

 त्यानंतर सुवासिनींच्या कपाळाला हळदी कुंकू लावले जाते आणि हातामध्ये तीळ किंवा तिळाचा लाडू द्यावा लागतो 

 हळदी कुंकू लावून झाल्यानंतर सर्व सुवासिनींच्या पाया पडावे.

 हे सर्व झाल्यानंतर आपण आणलेले वाण ओटीमध्ये ( साडीच्या पदरामध्ये ) घालून 

या ठिकाणी उखाण्यांचा कार्यक्रम देखील आयोजित करू शकतात. तसेच गाणी म्हणणे, डान्स, वेगवेगळे खेळ यांचा देखील या कार्यक्रमांमध्ये समावेश असतो 

अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पाडला जातॊ 

हळदी कुंकू म्हटलं म्हणजे सुवासिनींना वाण काय द्यावं हा तर सर्वात मोठा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. हळदी कुंकवासाठी काय काय वस्तू वाण म्हणून देऊ शकतो ज्या वस्तु आपल्याला परवडणाऱ्या असतात त्या वस्तु आपण वाण म्हणून देऊ शकतो शेवटी कार्यक्रम संपल्यावर सर्व महिला एकमेकाचा निरोप घेतात

….कार्यक्रमाला अनिता रोडगे .गंगासागर मुटकुळे.राणी जगताप .दीपाली लक्कस .रमा काळे .ज्योती इंगळे. पायल ठक्कर .मनीषा तांगडे .पायल राजपूत .वनीता म्हस्के .निता आव्हाड इत्यादी महिला शिक्षिका उपस्थित होत्या.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close