हॉटेल्स सकाळी 5 पर्यंत खुले राहणार पण मिळणार ‘इतकेच’ पेग, जाणून घ्या थर्टी फस्टसाठीची नियमावली
परवाना देखील 3 ते 6 महिन्यांसाठी निलंबित होणार आहे.

🙆🏻♂️ हॉटेल्स सकाळी 5 पर्यंत खुले राहणार पण मिळणार ‘इतकेच’ पेग, जाणून घ्या थर्टी फस्टसाठीची नियमावली
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
▪️ नववर्षानिमित्त अतिरिक्त दारूबंदी लागू करण्यात आली असून 31 डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये चार पेगपेक्षा जास्त पेय पिण्यास परवानगी दिली जाणार नाही. हॉटेल असोसिएशनचे म्हणणे आहे की या पावलामागे लोकांना सुरक्षित ठेवण्याचे कारण आहे.
▪️ याशिवाय अपघात टाळण्यासाठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सना मद्य सेवा देण्यापूर्वी ग्राहकांचे वय निश्चित करण्यासाठी ओळखपत्रे तपासून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मद्यप्राशन करणाऱ्या ग्राहकांसाठी वाहनचालकांची व्यवस्था केली जाईल.
▪️ तसेच दारू पिऊन गाडी चालवणे महागात पडणार आहे. तसे आढळल्यास चालकावर गुन्हा दाखल होतो. मद्यपी चालकाचा खटला खटला पाठविला जातो. तिथे 10 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. मद्यपी चालकाला किमान 6 महिन्यापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. तसेच परवाना देखील 3 ते 6 महिन्यांसाठी निलंबित होणार आहे.





