पिशोर येथे अवैध गुटखा विक्रेत्यावर धाड १६८६४७/- रुपयेचा माल जप्त.
सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी ही कारवाई केली आहे

पिशोर येथे अवैध गुटखा विक्रेत्यावर धाड १६८६४७/- रुपयेचा माल जप्त.
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज प्रतिनिधी:राजू जंगले छ्त्रपती संभाजी नगर
कन्नड तालुक्यातील पिशोर पोलिसांनी शफेपुर येथील एका दुकानावर धाड मारत १६८६४७/- रुपयांचा अवैध गुटखा रात्री ९.१० वाजता जप्त केला आहे. राज्य सरकारने मानवी जीवनास अपायकारक गुटखा विक्रीस प्रतिबंधीत केला आहे. परंतु पिशोर येथील आरोपी अक्रम शहा अस्लम शहा (३७) बब्बू शहा अस्लम शहा (३५) यांनी अवैध गुटखा साठवून विक्री करीत होते.यात एकास अटक तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे.
पिशोर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय महितीद्वारे शफेपुर भागतील हरी मस्जिद जवळील आरोपी अक्रम शहा व बब्बू शहा हे स्वतःच्या मालकीच्या किराणा दुकानात अवैध गुटखा साठवून विक्री करत होते. सदरील जागेवर पिशोर पोलिसांच्या पथकाने छाप मारला असता त्यांच्या ताब्यातून विविध प्रकारचा १६८६४७/- रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांच्या फिर्यादीवरून अक्रम असलम शहा (वय ३७) व बब्बू अस्लम शहा ( ३५ दोघे रा. पिशोर) यांच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी ही कारवाई केली आहे.
