
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी
▪️सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा
▪️पुण्यातील भोसरीत धक्कादायक प्रकार, 7500 मतदारांची नावं गायब; मतदारांचा प्रचंड संताप
▪️नांदगावमध्ये राडा , शिंदे गटाचे सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, तुझ्यासारखे 56 पाहिलेत
▪️निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
▪️एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात तर भाजपा सर्वात मोठा पक्ष
▪️मविआ, महायुतीत लढत अटीतटीची, दोघांनाही संधी सत्ता स्थापनेची; चक्रावून टाकणारा एक्झिट पोल समोर
▪️परळीतील राड्यानंतर घाटनांदुरमधील ईव्हीएम फोडले, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान
▪️बीडमधील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच मृत्यू, कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
▪️ मेळघाट परिसरातील 6 गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार, सुविधा नसल्यानं आदिवासी बांधव आक्रमक, मतदान केंद्रावर शुकशुकाट
▪️नेपोटीझमचा मुद्दा उचलून भांडणाऱ्या कंगना रणौतनं केलं शाहरुख खानच्या लेकाचं कौतुक
