राज्यसामाजिक

मारसावळी येथे चंपाषष्टी सोहळ्या निमित्त बैठक संपन्न..!

कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करू असे भक्तांनी दिले आश्वासन

मारसावळी येथे चंपाषष्टी सोहळ्या निमित्त बैठक संपन्न..!

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क

मारसावळी: श्री गुणेश्वर महादेव संस्थान मारसावळी. येथे मोठ्या उत्साहात साजरा होणारा चंपाषष्ठी सोहळ्याच्या  अनुषंगाने सुरु होत असलेला  ज्ञानयज्ञ सोहळा व श्री शिव महापुराण कथा कार्यक्रमाचा प्रारंभ दिनांक 30 नोव्हेंबर 2024 व कार्यक्रमाची सांगता 7 डिसेंबर 2024  रोजी होणार आहे  त्या दिवशी अखंड हिंदुस्तानाचे कुलदैवत श्री मार्तंड मल्हारी म्हणजेच खंडोबा देवाची मूर्तीची स्थापना व कळस रोशन सोहळा देखील पार पडणार असून या पार्श्वभूमीवर  शिवभक्त परमपूज्य श्री गुणाजी महाराज गाडेकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक  9 नोव्हेंबर वार शनिवार रोजी  मोठ्या उत्साहात कार्यक्रमा संदर्भात बैठक पार पडली. त्यावेळी सर्व साधक परिवार भक्त परिवार व शिष्य परिवार उपस्थित होते. त्यावेळी बाबांचे असणारे अलौकिक मार्गदर्शन सर्वांचे कान तृप्त करणारे होते सर्वांनी जिवांच्या अंतकरणातून बाबांनी दिलेली जिम्मेदारी पूर्णपणे पार पाडू अशी ग्वाही देत नियोजन बैठक पार पडली व कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करू असे भक्तांनी आश्वासन दिले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close