क्राइम

मध्यवर्ती बसस्थानकात छत्रपती संभाजीनगर अतिरेकी घुसले

स्थानिक पोलीसाच्या कारवाई मधे दोन संशर्ईत अतिरेकी पकडले

मध्यवर्ती बसस्थानकात छत्रपती संभाजीनगर अतिरेकी घुसले 

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क

आज दिनांक 19 रोजी सकाळी,8 वाजेच्या सुमारास, कंट्रोल काॅल आल्यावर, स्थानिक पोलीस यांच्या सतर्कतेने, नागरिक व प्रवाशांना,इशारे वजा सावधान करत होते, शांतता ठेवा धावपळ करु नका ,गडबड गोंधळ करू नका, मोठ्या प्रमाणात पोलीसांची वेळ,वेगळी पथके येत आहेत,थोडाच वेळात,क्यु आर टी QRT ,व घातक कारवाई पथक,बंदुका ,रायफल,सह मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दाखल झाले,बाॅम शोधक व नाशक पथक,डाॅग स्काॅड, दाखल झाले,बघता बघता , पोलीसांच्या गाड्या ,व पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असल्याने,नागरिक ,प्रवाशी घाबरत होते ,नेमकं काय झालं असेल , बस स्थानकाच्या मेन गेट मधुन बंदुकधारी, पोलीसांच्या एन्ट्री मुळे ,अजुनच प्रवाशी ,महिला मुले घाबरतांना दिसली,त्यांना स्थानिक पोलीस व अधिकारी धीर देत होते,घाबरु नका पोलीस कारवाई सुरू आहे म्हणुन समजावून सांगत होते, स्थानक प्रमुख यांच्या दालनात एक संशर्ईत अतिरेकी,घुसला होता,त्याला प्रथम , पकडण्यात आले व नंतर त्याला विचारले असता , अजुनही एक साथीदार असुन बस स्थानक परिसरात असल्याचे समजले ,प्रवाशी चौकशी खिडकी च्या समोरील , जळगाव बस पाॅईट वर बाकड्यावर बसलेल्या दुसऱ्या ही संशर्ईत अतिरेकी यांच्या वर हल्ला करत ,पथकांनी त्याला ताब्यात घेतले, अचानक घडत असलेल्या प्रसंग बघुन प्रवासी ,घाबरून गेले, गर्दी बरीच होती बसस्थानकावर अतिरेकी शोधून काढणे ही अवघडच होते परंतु चे अधिकारी व वाहतुक निरिक्षण, बाबासाहेब साळुंखे साहेब, यांच्या सहकार्याने, बसस्थाक पोलीस,व काही सजग नागरिक यांच्या सहकार्याने बसस्थाक मधे खुसलेल्यी दोन्ही संशर्ईत अतिरेकी यांना पकडण्यात आले, व सर्वांनी सुटकेचा निःश्वास घेतला ( टिप : क्यु आर टी व घातक कारवाई पथकाची रंगीत तालीम अचानक पणे मध्यवर्ती बसस्थानक आज सकाळी घेण्यात आली )

या कारवाई साठी , पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, क्युआरटी पथक ORT पथक व घातक कारवाई पथकाचे पोलीस उपनिरीक्षक, महादेव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक,आर बी पाटोळे, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर पाटील, बसस्थानक चौकी,मजित पटेल,नरवडे, अर्शद शेख,श्रीहरी जाधव,अस्लम शेख, सह बसस्थानक मधील सुरक्षा रक्षक,यांचे सहकार्य लाभले, बसस्थानक आगार व्यवस्थापक आगार क्रमांक – २ श्री अजय पाटील ,तसेच सुरक्षा निरिक्षक श्री सतिश गायकवाड,व श्री अशोक शिंदे,वाहतुक निरिक्षक श्री बाबासाहेब साळुंके, पोलीसांचे पथक,क्यु आर टी पथक,घातक कारवाई पथक,डाॅग स्काॅड,बाॅम शोधक व नाशक पथक सह वेळ वेगळ्या अधिकारी व कर्मचारी अंमलदार यांचा कारवाई मधे सहभागी झाले होते. 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close