
वर्ध्यातील कराळे मास्तरांना मारहाण
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
हो आपण बरोबर वाचले बातमी आहे वर्धा जिल्ह्यातील कराळे मास्तरांची.
वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते नितेश कराळे यांना मारहाण झाल्याची घटना घडली असून मांडवा गावातून मतदान करून परतत असताना ही घटना घडल्याचे समजते भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप कराळे मास्तरांनी केला आहे. उमरी मेघे येथील उपसरपंच सचिन कोसे यांनी मारहाण केली असल्याची माहिती आहे. कराळे मास्तरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने वर्ध्यात मोठी खळबळ उडाली. पत्नी आणि मुलीला देखील मारहाण व शिवीगाळ झाल्याचा आरोप कराळेंनी केला आहे.
