शैक्षणिक

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या निवडणुकीत डॉ.संजय शिंदे अध्यक्षपदी, प्रा.रवींद्र पाटील उपाध्यक्ष

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या निवडणुकीत डॉ.संजय शिंदे अध्यक्षपदी, प्रा.रवींद्र पाटील उपाध्यक्ष

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क

दि. 02/02/2025 रोजी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची राज्य कार्यकारणीची निवडणूक नेस वाडीया काॅलेज, बंडगार्डन, पुणे येथे संपन्न झाली.
यावेळी महासंघाचे नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी मा. प्रा. पंडीतराव पाटील (पुणे), सहा. निवडणूक अधिकारी मा. प्रा. शिवाजीराव जगताप (ठाणे) व मा. प्रा. बी. ए. पाटील (धुळे) व निरीक्षक प्रा.एस.टी.पवार यांनी कामकाज पाहिले.
राज्य कार्यकारणी ची निवडणूक खेळीमेळीने पार पडली
कार्यकारणी पुढील प्रमाणे.
1) प्रा. डॉ. संजय शिंदे – राज्याध्यक्ष
2) प्रा. लक्ष्मण रोडे (पुणे) – सरचिटणीस
3) प्रा. अविनाश बोर्ड (अमरावती ) –
कार्याध्यक्ष
4) प्रा. रविंद्र पाटील (छत्रपती संभाजीनगर) – उपाध्यक्ष
5) प्रा. रवींद्र भदाणे (मुंबई ) -उपाध्यक्ष
6) प्रा. शिवराम सुर्यवंशी (लातूर) – उपाध्यक्ष
7) प्रा.अशोक गव्हाणकर( नागपूर) – कोषाध्यक्ष
8) प्रा.दिलीप शितोळे (कोल्हापूर) -सहसचिव.
9) मा. प्रा. मुकुंदराव आंधळकर(मुंबई) -समन्वयक
10) मा. प्रा. संतोष फाजगे (पुणे ) – सल्लागार.
देवगिरी महाविद्यालयातील कला शाखेचे पर्यवेक्षक म्हणून 24 वर्षापासून कार्यरत असलेले *प्रा.रवींद्र पाटील यांची राज्य कार्यकारणीच्या उपाध्यक्ष्य पदी आज निवड झाली.*
रवींद्र पाटील यांचा मोठा मित्रपरिवार, कार्यतत्पर, सेवाभावी वृत्तीचा वसा घेतलेले, संघटनेच्या कामात अभ्यासपूर्ण मत मांडणारे , अजातशत्रू अशी त्यांची ओळख सर्वांना आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची कामे असतील तसेच शिक्षक व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी असतील , सर्व मागण्या अत्यंत प्रभावी पणे मांडण्यासाठी राज्यस्तरावर या महत्वाच्या पदाचा त्यांना निश्चितच फायदा होईल व त्याचा ते पुरेपूर उपयोग करतील अशी अपेक्षा देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन जी गायकवाड यांनी व्यक्त केली. कनिष्ठ महाविद्यालय संच मान्यतेमध्ये विद्यार्थी संख्या, आश्वासित प्रगती योजना, जुनी पेन्शन योजना, अनुदान वितरण, इ. संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रा.रवींद्र पाटील यांनी सांगितले.
त्यांच्या निवडीबद्दल बामू विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.भारत खैरनार, स.भू. महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय गायकवाड, विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रदीप पाटील, देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुरेश लिपाने, डॉ.गणेश मोहिते, प्रा.शिवानंद भानुसे, प्रा‌.राकेश खैरणार यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close