
🗣️ मराठी भाषेसंदर्भात राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी!
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी!!
💁♀️ मराठी भाषेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमधील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना फक्त मराठीत बोलणे बंधनकारक केले आहे.
💥 यासंदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयात स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी महामंडळे आणि सरकारी अनुदानित आस्थापनांमध्ये देखील मराठी बोलणे सक्तीचे करण्यात आले आहे.
🫡 गेल्या वर्षी मंजूर झालेल्या मराठी भाषा धोरणात मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार व विकास होण्याच्या अनुषंगाने केवळ शिक्षणाचेच नव्हे तर सर्व लोकव्यवहाराचे होता होईल तेवढे मराठीकरण होणे आवश्यक आहे.
🤝 त्यासाठी संवाद, संपर्क आणि सर्व स्तरावरील व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे, असं राज्य सरकारने म्हटलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
