माय सावित्री म्हणजे अन्याय सहन करून निरंतर कार्य करणारी साक्षात देवी -डॉ.सीमाताई पाटील
आभार प्रदर्शन साहित्यिक श्रीधर बच्छाव यांनी मानले.....

माय सावित्री म्हणजे अन्याय सहन करून निरंतर कार्य करणारी साक्षात देवी–डॉ.सीमाताई पाटील
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
पूर्णा कावेरी शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यालय व रामेश्वर इंग्लिश स्कूल क्षीरसागर या शाळेत ०३ जानेवारी रोजी राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका व महिला मुक्ती दिन म्हणुन साजरा करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ .सीमाताई पाटील मॅडम डॉ .आशीष पाटील सर आदरणीय अजिंक्य पाटील सर मुख्याध्यापिका अरुणा सोनवने प्रिन्सिपल जगदीश कापुरे यांच्या हस्ते राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली
शाळेतील मुलींनी सावित्री बाईची वेषभूशा केली होती विद्यार्थ्यानी सावित्रीबाई फुले यांच्या जीवना वर नाटिका सादर केल्या व आपले मनोगत व्यक्त केले सावित्री बाई फुले जयंती निमित्त चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहून्याच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले
प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या डॉ सीमाताई पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की माता सावित्री जल्माला आली म्हणुन आज महिला शिकत असून प्रत्येक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करत आहेत माता सावित्रीने स्वता छळ अन्याय सहन करत महिलासाठी आपले सम्पूर्ण जीवन समर्पित केले आजच्या पिढीला सावित्रीबाई फूलेच्या विचारांची नितांत गरज आहे माता सावित्रीने जातीवाद केशवपण विधवापद्धत बालविवाह सतीची चाल अंतरजातीय विवाह या वाईट कुप्रथा वर आवाज उठ्वुन महिलांना बंदिस्त जोखड मधून बाहेर काढण्यासाठी सम्पूर्ण आयुष्य समाजाचा छळ सहन करत राहिल्या म्हणूनच त्या महान अशा राष्ट्रमाता आहेत असे प्रतिपादन डॉ .सिमाताई पाटील यांनी केले
…कार्यक्रमाला शुभम कचरे. किशोर आरके.दीपक उचित .नितीन दांडगे. अमोल राऊत प्रदीप कूदळे सोमीनाथ मोरे .प्रदीप शेळके .अनिता रोडगे गंगा सागर मुटकुळे.अर्चना बोरडे .राणी जगताप इत्यादि कर्मचारी हजर होते
सूत्रसंचानल इयत्ता नववीच्या विद्यार्थीनी वैष्णवी इंगळे व पाबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन साहित्यिक श्रीधर बच्छाव यांनी मानले…..
