क्राइम

या परिसरात तलवार व सुरा घेवुन दहशत निर्माण करण्याऱ्या इसमास केले जेरबंद

इसमाविरुध्द पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूज परिसरात तलवार व सुरा घेवुन दहशत निर्माण करण्याऱ्या इसमास केले जेरबंद

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी राजू जंगले वाळूज

वाळूज:पोलीस आयुक्त, मिश्रा पोलीस उपआयुक्त, पंकज अतुलकर (परिमंडळ-1) सहा. पोलीस आयुक्त, छावणी विभाग भागिरथी पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक,सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक/ प्रविण पायरकर, पोह/सुरेश कचे, पोअं/1234 राजाराम वाघ, पोअं/2083 दिपक जाधव, पोअं/2292 सुरेश भिसे, पोअं/2759 जयेश साळुंके, पोअं/शिवनारायण नागरे यांचे मोलाचे उत्तम कार्य बघायला मिळाले.

गुन्हयांची थोडक्यात हकिकत

     पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना गोपनिय बातमी मिळाली की, वाळुंज पोस्टे अदखलपात्र गुन्हा रजि न २६५७/२०२५ कलम बीएनएस प्रमाणे दाखल गुन्ह्यातील गैअर्जदार ईसम तसेच सराईत गुन्हेगार नामे करण गायकवाड हा हातात तलवार व सुरा घेवुन दहशत माजवत आहे. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक, श्री. सागर पाटील, पोउपनि/प्रविण पाथरकर पोहवा/कचे पोअं/1234 राजाराम वाघ, पोअं/2083 दिपक जाधव, पोअं/2292 सुरेश भिसे, पोअं/2759 जयेश साळुंके, पोअं/2083 दिपक जाधव यांना आदेश देवुन तात्काळ सदर ठिकाणी जावुन नमुद इसमास ताब्यात घेवुन कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यावर पोउपनि सागर पाटील व त्यांचे पथकाने हातात तलवार वडगाव कोल्हाटी शिवाजीनगर परिसरात दहशत माजवणारा करण मारोती गायकवाड वय २४ वर्ष रा.शाताई शाळेच्या बाजुला शिवाजीनगर वडगांव ता.जि छत्रपती यास शिताफीने ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन एक धारधार तलवार व एक धारधार सुरा असा 3,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद इसमाविरुध्द पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close