क्राइम

पैठण तालुक्यातील डोणगाव शिवार हादरले!

अवैध वृक्षतोड प्रकरणाने शेतकरी पेटले; वनविभागाच्या संगनमताचा संशय, कठोर फौजदारी कारवाईची मागणी

पैठण तालुक्यातील डोणगाव शिवार हादरले!

अवैध वृक्षतोड प्रकरणाने शेतकरी पेटले; वनविभागाच्या संगनमताचा संशय, कठोर फौजदारी कारवाईची मागणी

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था छ्त्रपती संभाजीनगर 

पैठण तालुक्यातील तांबे डोणगाव शिवारात अवैध वृक्षतोड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील गट क्रमांक 163 मध्ये अंदाजे 2 ते 10 वर्षे वयाची लिंबाची झाडे तसेच 10 ते 12 बाभळीची झाडे कोणतीही शासकीय परवानगी अथवा नोंदणी न घेता निर्दयपणे तोडण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून, “गाव हिरव्या ऐवजी रखरखीत करण्याचा कट कोणाचा?” असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी झाडांचे असलेले महत्त्व सर्वश्रुत असतानाही, बेकायदेशीररित्या होत असलेली ही वृक्षतोड वनविभागातील काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय शक्यच नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

या प्रकरणात शेतकरी वर्गाने वनविभागाने घटनास्थळी पाहणी केली असली तरी केवळ औपचारिकतेपुरते न थांबता, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी तीव्र मागणी शेतीमालक भाऊसाहेब तांबे यांनी केली आहे.

“फक्त दंड लावून थांबू नका; झाडांची नासधूस करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल व आंदोलना चा इशारा देखिल शेतकऱ्यांनी दिला आहे.

आता वनविभागाचे अधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहतात का आणि दोषींवर नेमकी कोणती ठोस कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close