फुलंब्री 71 ग्रामपंचायती पैकी 37 ग्रामपंचायती महिला सरपंच चालवणार
सोडत काढण्यासाठी नोडल अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पैठण / फुलंब्री चे निलम बाभणा मॅडम, नायब तहसिलदार राऊत सर, तहसिल चे कर्मचारी, सर्व गावातील गावकरी मडळी उपस्थित होते.

फुलंब्री 71 ग्रामपंचायती पैकी 37 ग्रामपंचायती महिला सरपंच चालवणार
साक्षर इंडिया लाईव्ह नुज प्रतिनिधी अमोल कोलते फुलंब्री छत्रपती संभाजीनगर
फुलंब्री – फुलंब्री तालुक्यातील 71 ग्रामपंचायती 11 एप्रिल ला तहसील कार्यालयात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढणयात आली असुन. जानेवारी 2026 मध्ये पहिल्या टप्प्यातील तब्बल 53 ग्रामपंचायतीची तर दुसऱ्या टप्प्यात दोन वर्षानंतर उर्वरित 18 ग्रामपंचायती निवडणूक असणार आहे.
फुलंब्री तालुक्यात ७१ ग्रामपंचायती आहे. गावातील गावपुढाऱ्यांची गावात असलेली पत ठरविण्याची ग्रामपंचायत निवडणूक आहे. या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे गाव पुढाऱ्यांचे लक्ष लागले होते ते सर्वांनाच आरक्षणाची उत्सुकता होती.मागील गेल्या पाच वर्षात गावात केलेल्या कामाची पावती मिळण्यासाठी अनेक गाव पुढारी ग्रामपंचायतच्या निवडणुकीला सामोरे जाते.
परंतु लोकशाहीच्या या सोहळ्यात चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. तर अनेकांना घरचा रस्ता मिळतो. मतदान रुपी जनता जनार्दन मतदान करून आपला लोकप्रतिनिधी निवडतात. परंतु पुढील पाच वर्ष संबंधित लोकप्रतिनिधीच्या कामाचे मूल्यमापन केले जाते. त्यावरूनच गावातील गाव पुढारी सरपंच पदाचा मानकरी ठरतो.
याप्रमाणे ग्रामपंचायत आरक्षण :
अनु. जाती . 1 पिपंळगाव वळण2 वाहेगाव 3 साजुळ,
अनु. जाती (महीला) 1 बिल्डा,2 शिरोळी बु.,3 लालवण,4 वारेगाव,
अनु. जमाती (महीला),1 लेहा जाहगीर
ना.मा.प्र 1 पाल,2लहाण्याचीवाडी,3 बाबरा 4 बाभूळगाव खु 5 आडगाव बु.6 सताळा बु.7 पाथ्री8 पिरबावडा 9 गिरसावळी 10 गेवराई गंगी
ना.मा.प्र. (महीला ) 1 कान्होरी 2 निधोना3सोनारी ब् 4खामगाव 5 बोरगाव अर्ज,6 शेलगाव खु.7 मारसावळी 8 वाघलगाव 9 आडगाव खु.10 धानोरा
स.सा मुर्शिदाबादवाडी 2 चिंचोलि बु.3 शिरोडी खु. 4 वावना 5 चिंचोलि न.6 उमरावती 7 सताळा पिप्री 8 जळगाव मेटे 9 वडोद बाजार 10 नरला 11 धामणगाव,12 हिवरा 13 किनगाव 14 वाघोळा 15 ममनाबाद 16 वाकोद 17 महालकिन्होळा 18 नायगाव 19 जातेगाव 20 टाकळी कोलते 21 निमखेडा
स.सा. (महीला ) 1 गणोरी 2 शेलगाव जानेफळ 3 नायगव्हाण 4 डोगरगाव कवाड 5 दरेगाव दरी 6 बोधेगाव बु. 7विरमगाव 8 डोगरगाव शिव 9 सुलतानवाडी 10 आळद 11 लोहगडनांद्रा 12 पिंपळगाव गांगदेव 13 रिधोरादेवी14 तळेगाव 15 वानेगाव बु.16 बोधेगाव खु. 17 पेंडगाव आळद 18 शेवता खु.19 गेवराई पायगा 20 राजणगाव21 कान्हेगाव 22 जातवा या आरक्षण सोडत काढण्यासाठी नोडल अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पैठण / फुलंब्री चे निलम बाभणा मॅडम, नायब तहसिलदार राऊत सर, तहसिल चे कर्मचारी, सर्व गावातील गावकरी मडळी उपस्थित होते.
