
मारसावळीत आज निघणार भव्य दिव्य पालखी मिरवणूक
मारसावळीत शिवमहापुराण कथा, ज्ञानयज्ञ
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
उद्या खंडोबा देवाची प्राणप्रतिष्ठा स्थापना व कलश पूजन वेळ सकाळी 4 ते 6
फुलंब्री : तालुक्यातील मारसावळी येथील गुणेश्वर महादेव मंदिराचा दहाव्या वर्धापन दिनानिमित्त ता. ३० नोव्हेंबर पासून ६ डिसेंबरपर्यंत शिव महापुराण कथा, ज्ञानयज्ञचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा भाविक लाभ घेत आहे विशेष म्हणजे आज दुपारी 2 ते 6 श्री सावळेश्वर देवस्थान देवदरी ते श्री गुणेश्वर देवस्थान मारसावळी अशी भव्यदिव्य पालखी मिरवणूक असणार आहे या सोहळ्यास सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर प्रतिष्ठानचे गुणाजी महाराज गाडेकर यांनी केले आहे.
श्री गुणेश्वर प्रतिष्ठान येथे शिवमहापुराण कथाचे वाचन केले जात आहे. यामध्ये काकडा, भजन, आरती, हरिपाठ आणि शिव महापुराण कथा मोठ्या उत्साहात सुरू आहे. त्याचबरोबर सकाळ, दुपार आणि संध्याकाळ तीन वेळेस महाप्रसादाचे वाटप देखील होत आहे. उद्या शनिवार 7 डिसेंबर खंडोबा देवाची प्राणप्रतिष्ठा स्थापना व कलश पूजन वेळ सकाळी 4 ते 6 या वेळेत होणार आहे. काल्याचे किर्तन सकाळी 9 ते 11 या वेळेत होईल तदनंतर शिवभक्त परमपूज्य गुणाजी महाराज गाडेकर बाबा यांचे मार्गदर्शन 11 ते 1 या वेळेत होईल व नंतर महाप्रसाद होईल.
