राजमाता जीजाऊ साहेबांचे विचार जिवंत ठेवणे आजच्या काळाची गरज डॉ .सीमाताई पाटील

राजमाता जीजाऊ साहेबांचे विचार जिवंत ठेवणे आजच्या काळाची गरज डॉ .सीमाताई पाटील
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
पूर्णा कावेरी शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यालय व रामेश्वर इंग्लिश स्कूल क्षीरसागर या शाळेत १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता राजमाता वीरमाता माँ जिजाऊ साहेबांचा जल्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सिमाताई पाटील. प्रमुख पाहुणे श्रीमती रंजनाताई पाटील डॉ .आशीष पाटील तरुणांचे प्रेरणास्थान अजिंक्य पाटील मुख्याध्यापिका अरुणा सोनवने प्रिन्सिपल जगदीश कापुरे यांच्या हस्ते राष्ट्रमाता जीजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना ने कार्यक्रमाला सुरवात झाली.
शाळेतील विद्यार्थ्यानी राष्ट्रमाता, जीजाऊ व स्वामी विवेकानंदाची वेशभूषा केली होती तसेच, राष्ट्रमाता व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यानी नाटिका गीत नृत्य संवाद व मनोगत व्यक्त करून जिजाऊ व स्वामी विवेकानंदाचे प्रेरक विचार मांडले
कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा शिक्षणप्रेमी सीमाताई पाटील मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करतांना म्हटले की राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांनी अगदी कठिन परिस्थितीत राजे छत्रपती शिवाजी महाराजाच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहून हिंदवी स्वराज्यातून सुराज्य निर्माण केले स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते तेव्हा कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता स्वताचे मत व्यक्त करण्याचा अधिकार नव्हता अशा काळात ही वीरमाता मात्र या देशातील, अन्याय व अत्याचार मातीत गाडन्याचे स्वप्न पहात होती आणी कोणताही जात धर्म पंथ हा भेदभाव न करता सर्वाना समान न्याय व अधिकार देण्याचे संस्कार माता जिजाऊने शिवबा ला दिलेत म्हणूनच राजे छत्रपती शिवाजी हिंदवी सुराज्य स्थापन करू शकलेत राष्ट्रमाता जिजाऊचे विचार घराघरात आणी घराघरातून प्रत्येकाच्या मनामनात रुजले पाहिजेत माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरक विचारांची आजच्या काळात नितांत गरज आहे असे प्रतिपादन डॉ .सीमाताई पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले
या कार्यक्रमाला साहित्यिक श्रीधर बच्छाव. शुभम कचरे. किशोर आरके. अमोल राऊत .नितीन दांडगे. प्रदीप कूदळे सोमीनाथ मोरे .प्रदीप शेळके भूषण पिताबंरे .दत्ता शिंदे .अनिता रोडगे गंगासागर मुटकुळे.अर्चना बोरडे .राणी जगताप ज्योती इंगळे. मंजू शिंदे. दीपाली, लक्कस इत्यादि कर्मचारी हजर होते.
,सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थीनी वैष्णवी इंगळे व अनूजा सोनूने यांनी तर आभार प्रदर्शन सहशिक्षिक दीपक उचित यांनी मानले.
