
गणोरी प्रशालेच्या बालवैज्ञानिकाचा आमदार अनुराधा चव्हाण यांच्या कडुन गौरव
शाळेच्या प्रगतीवर व्यक्त केले समाधान
साक्षर इंडीया लाईव्ह न्युज प्रतिनिधी:अमोल कोलते फुलंब्री छ संभाजीनगर
जिल्हा विज्ञान प्रदर्शनास पहिल्या क्रमांकाने राज्यस्तरासाठी पात्र ठरलेल्या गणोरी येथील जिप प्रशालेची बाल वैज्ञानिक कू.आरती बंडू भादवे या विद्यार्थिनीचा आमदार श्रीमती अनुराधाताई अतुल चव्हाण यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन आपल्या निवासस्थानी गौरव केला.विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक उपकरणाच्या पेटंट साठी आपण पाठपुरावा करू असे आमदार श्रीमती अनुराधा चव्हाण यांनी संगितले.
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज तंत्रनिकेतन यांच्या वतीने कांचनवाडी येथे घेण्यात आलेल्या 52 व्या तीन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद गणोरी येथील प्रशालेची विद्यार्थिनी कु.आरती बंडू भादवे हिने दिव्यांग माध्यमिक गटात पहिला क्रमांक पटकावत राज्यस्तरावर झेप घेतली आहे.राज्य पातळीवर राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या वतीने नागपूर येथे होणाऱ्या शिखर विज्ञान प्रदर्शनात ती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशा करीता आमदार श्रीमती अनुराधा अतुल चव्हाण यांनी यशस्वी विद्यार्थीनी, मुख्याध्यापक आणि शिक्षणाप्रेमी ग्रामस्थांना निवासस्थानी पाचारण करून शाळा आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव केला.
या सत्कारासाठी माजी उपसरपंच श्री बाळासाहेब पाटील तांदळे यांनी पुढाकार घेतला.याप्रसंगी गणोरी येथील माजी उपसरपंच श्री बाळासाहेब पाटील तांदळे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गायकवाड,पालक बंडू भादवे….. आदीची उपस्थिती होती. या यशाबद्दल त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक अनिल प्र देशमुख यांचे अभिनंदन करून श्री देशमुख यांच्यासह ज्येष्ठ शिक्षक श्री अरविंद राजहंस, रामेश्वर जाधव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.गणोरी शाळेच्या फुलंब्री तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशस्वी होऊन जिल्हास्तरावर प्रतिनीधीत्व केलेल्या शाळेचे विद्यार्थी ओम लहाने,शिवानी उबाळे,दक्षिणी चंद्रे,वंदना सामसे, रोहित भादवे, वैष्णवी तांदळे, गायत्री शेळके, मार्गदर्शक प्राथमिक पदवीधर शिक्षिका श्रीमती सविता बारसाकडे यांचा सत्कार माजी उपसरपंच बाळासाहेब पाटील तांदळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री कैलास गायकवाड,कैलास सोनवणे, रवींद्र गायकवाड,भाऊसाहेब चंद्रे, ज्ञानेश्वर गायकवाड बाळू गायकवाड, अजिनाथ तांदळे कृष्णा तांदळे, बंडू भादवे, उपाध्यक्ष राधाकृष्ण पेहरकर,यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी उपसरपंच श्री बाळासाहेब पाटील तांदळे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.प्रशालेत झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू.दीपक उबाळे याने केले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत नागराज परदेशी, श्री सुरेश ठाकूर श्रीमती सुलभा पळशीकर आदींनी केले.
