मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून 2016 ते 2024 दरम्यान 100 हून अधिक शिक्षकांची भरती
पंजाब किंग्सने मैदान मारलं! 111 धावा विजयासाठी देऊनही कोलकात्याला रोखलं

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज सकाळच्या घडामोडी
▪️शेतकऱ्यांसह संपूर्ण भारतासाठी मोठी खूशखबर, यावर्षी सरासरीच्या 105 टक्के पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाची माहिती
▪️नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांना पदमुक्त करण्याचे अधिकार पुन्हा एकदा सदस्यांना बहाल, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
▪️पुण्यातील उद्योगपतीचा ‘सायबर मर्डर’, लक्ष्मण शिंदेंना कामाचा बहाणा करून पाटण्यात बोलावून निर्घृण हत्या, बिहारच्या स्पेशल टीमकडून पाच संशयित ताब्यात
▪️बीड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांतली तिसरी हत्या, बाबासाहेब आगे या तरुणावर भर बाजारात धारदार शस्त्रानं वार, आरोपी पोलिसांना शरण
▪️तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात कोर्टात 10,000 पानी आरोपपत्र दाखल, कुठल्या आरोपीने कोणती भूमिका बजावली याचा तपशील असल्याची माहिती, पेडलर पुजारी, राजकीय कनेक्शन समोर येणार
▪️मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून 2016 ते 2024 दरम्यान 100 हून अधिक शिक्षकांची भरती, नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यात धक्कादायक आरोप, सखोल तपास करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
▪️ ‘अंबादास काड्या करतोय’ असे म्हणणारे चंद्रकांत खैरे ‘मातोश्री’वरुन येताच नरमले, आमच्यात कोणताही वाद नसल्याचा खैरेंचा खुलासा
▪️अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, श्रीराम मंदिर ट्रस्टला आला ई-मेल, सुरक्षा यंत्रणा अलर्ट तर पोलिसांकडून सखोल तपास सुरू
▪️जालन्यात अतिवृष्टी, गारपिटीच्या अनुदानावर महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा डल्ला, बोगस शेतकऱ्यांच्या नावे 50 कोटींचे अनुदान हडपलं, जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत धक्कादायक प्रकार उघड
▪️पंजाब किंग्सने मैदान मारलं! 111 धावा विजयासाठी देऊनही कोलकात्याला रोखलं
