
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी
▪️ नितीन गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,’तुमसे ये उम्मीद नहीं थी’
▪️राज ठाकरे माझ्यावर जातीयवादाचा आरोप करतात, त्याला काय आधार आहे? काहीही ठोकून देतात, जे मूर्खासारखं बोलतात, त्याची नोंद का घ्यायची? शरद पवार यांचा हल्लाबोल
▪️आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने नरेंद्र मोदींना संविधान रिकामं वाटतं, रंगावरही बोलतात; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नंदुरबारमधून मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल
▪️माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ची गरज नाही; भाजप आमदार पंकजा मुंडे यांचं इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य
▪️2019 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत जाण्यासाठी घेतलेल्या बैठकीला शरद पवार आणि गौतम अदानी उपस्थित होते, अजित पवारांचा दावा; शरद पवार म्हणाले; उद्योगपतीच्या मर्जीने राजकारण चालत नाही
▪️मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, ‘मुंबई तुमची भांडी घासा आमची’; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
▪️उद्धव ठाकरेंचा सख्खा भाऊ लोणावळ्यात अपघातात गेला, तेव्हा म्हणाले; स्मारक आणि हॉस्पिटल बांधणार, झालं का ? खासदार नारायण राणे यांचा सवाल
▪️महाराष्ट्रातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले ? राहुल गांधींनी कुंडलीच मांडली
▪️उद्धवजी ज्यांनी तुमच्या सोबत गद्दारी केली, त्या आमदाराला धडा शिकवण्यासाठी आम्हाला बंडखोरीचा निर्णय घ्यावा लागला, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीबाबत काँग्रेस नेते सुनील केदार यांचे स्पष्टीकरण
▪️ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादात मोठी बातमी! क्रीडा मंत्रालयाने दिली मंजुरी, भारतीय संघ पाकिस्तानात जाणार
