
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी
▪️ देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, 31 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुकेश अंबानी, सचिन तेंडुलकर, शाहरुख खानसह मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रँड शपथविधी सोहळा
▪️ मविआच्या बड्या नेत्यांची महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याकडे पाठ, निमंत्रण देऊनही शरद पवार, उद्धव ठाकरे अनुपस्थित, पवारांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण
▪️ बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत, महायुतीच्या शपथविधी पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया
▪️’शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही’; शपथविधी सोहळ्याच्या जाहिरातीत महाराजांचे छायाचित्र न छापल्याने माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा संताप
▪️मागील पाच वर्षात सशस्त्र दलाच्या ७०० हुन अधिक जवानांनी केली आत्महत्या;गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांची राज्यसभेत माहिती
▪️ झोमॅटोच्या शेअरनं 22 महिन्यात दिला 512 टक्के परतावा, शेअर पहिल्यांदा 300 पार, गुंतवणूकदार मालामाल
▪️ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी संसद भवनात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला! वायनाडमधील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी केंद्राकडे 2 हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी
▪️ उदय सामंतांना उपमुख्यमंत्रिपद दिलं तर ते एक मिनिटात एकनाथ शिंदेंनाही सोडून जातील”, सुषमा अंधारेंचा टोला
▪️अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी;पहिल्याच दिवशी २००कोटींच्या कमाईचे संकेत
▪️ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी के एल राहुल आणि यशस्वी जैस्वालच सलामीला उतरणार, रोहित शर्माची माहिती
