
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी
▪️ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, भारताच्या अर्थतज्ज्ञाला जगभरातून श्रद्धांजली, देशात 7 दिवसांचा दुखवटा
▪️ रश्मिका मंदाना, सपना चौधरी, प्राजक्ता माळी या बीडमध्ये येतात, पॉलिटिकल इव्हेंट मॅनेजमेंटसाठी परळी प्रसिद्ध, सुरेश धस यांचा टोला
▪️ सतीश वाघ यांना संपवण्यासाठी 6 महिन्यांपासून प्लॅनिंग, सुपारीसाठी आणखी एकाकडे विचारणा; मोहिनी वाघचे कारनामे उघड
▪️ धनंजय मुंडेंना राजकारणातून संपवण्यासाठी सुरेश धसांनी सुपारी घेतली, अंजली दमानियांनाही कामाला लावले, आमदार अमोल मिटकरींचा आरोप
▪️ परळीतील एका व्यक्तीच्या नावावर 900 कोटींचे बँक व्यवहार, महादेव अॅपची लिंक बीड ते मलेशियापर्यंत लागेल, ‘आका’चा हा नवी परळी पॅटर्न; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
▪️ बीडच्या संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा, निकाल लागेपर्यंत धनंजय आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, मोर्चेकरांची मागणी
▪️ बाबांनी गावासाठी सगळं काही केलं, न्याय मिळेपर्यंत कुटुंबीयांच्या पाठीशी उभं राहा, संतोष देशमुखांच्या मुलीचं भावनिक आवाहन
▪️ बीडमध्ये वाल्मिक कराडच्या माध्यमातून गुन्हेगारी सुरु, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा गंभीर आरोप, अडीच वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व कोण करतंय आणि दहशत कुणाची ते बघा, नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा
▪️ मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय, मुंबईसह उपनगरात धुरकट वातावरण, हवेची गुणवत्ता पातळी खालावल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
▪️ चौथ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात 474 धावांचा डोंगर, तर दिवसअखेरीस 164 धावांच्या मोबदल्यात भारताचा निम्मा संघ माघारी
