शैक्षणिक

श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी येथे स्त्री- शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी भागचंद जाधव, शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते.

श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी येथे स्त्री- शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज प्रतिनिधी राजू जंगले छ्त्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजीनगर : श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी येथे सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमाचे समारोप भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव व सौ. हर्षला जाधव, सहसचिव अमन जाधव सर यांनी केले.कार्यक्रर्माचे समारोपण झाल्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शेळके सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कारकिर्दीची माहिती जसेकी भारतामध्ये प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, परंतु काही दशकांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. मुख्यत्वे महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मात्र त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या लढ्यामुळेच आज भारतामधील मुली मुक्तपणे शिक्षण घेत आहेत. सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी स्त्री शिक्षणासाठी उभारलेल्या चळवळीमुळेच भारतामधील महिला विविध क्षेत्रात मोठी प्रगती करत आहेत. अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची त्या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणूनही त्यांना ओळखले जाते. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, सातारा येथे झाला. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणूनही साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांना प्रथम स्वतःसाठी शिक्षणासाठी खूप संघर्ष कारवां लागला. नंतर त्यांनी इतर मुलींनाही शिक्षणासाठी मदत केली. सावित्रीबाई फुले यांच्याशिवाय देशाच्या शिक्षणाची आणि सामाजिक उन्नतीची बाब अपूर्ण आहे. ‘’तुझ्या प्रेरणेने घडो देश सेवा, तुझ्या चिंतनाने एकमय समाज व्हावा, तुझ्याच वात्सल्य प्रेरणेने राष्ट्र घडवू आम्ही “ ह्या सर्वा माहितीने विद्यार्थ्यांना प्राचार्य सरांनी संबोधित केले. तसेच कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी भागचंद जाधव, शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close