शैक्षणिक

ग्रीन ग्लोब इंग्लिश स्कूल,विद्या मंदिर येथे  आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

सर्व शिक्षक वृंद यांनीही योगाभ्यासाचा सराव केला

ग्रीन ग्लोब इंग्लिश स्कूल आणि विद्या मंदिर येथे  आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था 

छत्रपती संभाजीनगर: गुलमोहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्रीन ग्लोब इंग्लिश स्कूल आणि विद्या मंदिर येथे  आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने भारतीय योग संस्था दिल्ली शाखा छत्रपती संभाजी नगर यांचे योग प्रशिक्षक श्री सिद्धराम रामपुरे , श्रीमती अनिता काटे श्रीमती अर्चना उन्हाळे , श्रीमती अलका जोशी , श्रीमती विजयश्री लोणीकर व श्रीमती उमा करोडीवाल यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यास आणि प्राणायाम याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले .

कार्यक्रमाच्या शेवटी “योग करा आणि निरोगी रहा ” असा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी योगाभ्यास उत्साहाने केला .यानिमित्ताने संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती दाभाडे आणि मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना पवार व सर्व शिक्षक वृंद यांनीही योगाभ्यासाचा सराव केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close