सामाजिक

पंढरपूर येथे सात दिवस हरिनाम सप्ताह

विचारांच्या देवाण- घेवाणीसाठी हा सप्ताह खूप महत्त्वाचा असल्याचे भक्तगण सांगतात.

पंढरपूर येथे सात दिवस हरिनाम सप्ताह

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था 

पंढरपूर येथे सात दिवस हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. फुलंब्री तालुका पंचक्रोशितील जवळपास सातशे भाविक पंढरपूर येथे हरिनाम सप्ताहासाठी गेले असून हा सप्ताह सात दिवस विविध सांस्कृतिक कीर्तन – भजन समाज परिवर्तनासाठी जसे की व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या, बालविवाह, शैक्षणिक सामाजिक सलोखा, समता, बंधुत्व आदी सामाजिक उपक्रम कीर्तनाच्यामा ध्यमातून समाजापर्यंत नेण्याचे काम या सप्ताहातून होत आहे.

संत तुकाराम महाराज अभंगाप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे प्रमाणे झाडे लावा, वन वाचवा, गाडगेबाबांच्या गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा संदेश कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम असल्याचे प्रसिद्ध कीर्तनकार नारायण बांबर्डे महाराज यांनी यावेळी सांगितले. मराठवाडा आणि महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या, पावसाचा अभाव, नैसर्गिक आपत्ती यापासून शेतकऱ्यांची सुटका व्हावी आणि खरे बळीचे राज्य यावे अशी मागणी विठ्ठलाच्या चरणी आम्ही करीत आहोत असे आपल्या संदेशातून महाराजांनी सांगितले. यावेळी दररोज विविध महाराजांचे कीर्तनाचा लाभ भक्तांना मिळत आहे. या सप्त्यानिमित्त मार्गदर्शक नाना महाराज अडसूळ, रामदास महाराज बांबर्डे, नर्मदा ताई अन्नपूर्णे, लक्ष्मण पाटील बकाल, दामूपाटील काकडे, पूर्णा, बाई बलांडे, कोंडाबाई जिवरग, शकुंतलाबाई नाटकर, चांगुनाताई अडसूळ, गयाबाई बकाल, अंकिता ताई थोटे, कृष्णा महाराज पवार, भास्कर महाराज संदीप बोरसे, आहेर साहेब, खरात ताई, शेषराव महाराज बांबर्डे, यांच्यासह अनेक फक्त गणांची उपस्थिती लाभत आहे. प्रतिवर्षी या सप्हाहाचे आयोजन केल्या जाते. विचारांच्या देवाण- घेवाणीसाठी हा सप्ताह खूप महत्त्वाचा असल्याचे भक्तगण सांगतात.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close