पदक म्हणजे पराक्रमाची यशस्वी गाथा डॉ .सीमाताई पाटील

पदक म्हणजे पराक्रमाची यशस्वी गाथा डॉ .सीमाताई पाटील
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था
पूर्णा कावेरी शिक्षण संस्था सिल्लोड संचालित स्वामी विवेकानंद विद्यालय व रामेश्वर इंग्लिश स्कूल क्षीरसागर या शाळेत शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी कल्पना चावला यांच्या स्म्रुती दिनाचे औचित्य साधून अंतरशालेय क्रीडा महोत्सवात विशेष कसब दाखवणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रमुख पाहुणे डॉ सीमाताई पाटील व अजिंक्य पाटील यांच्या हस्ते सुवर्णपदक .रौप्यपदक कांस्यपदक व प्रमाणपत्र बहाल करून गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रिन्सिपल जगदीश कापुरे यांची व्यासपीठावर उपस्थिति होती विद्यार्थ्याचा गौरव व कौतुक करतांना प्रमुख पाहुण्या सीमाताई पाटील म्हणाल्या की शालेय जीवनात जे विद्यार्थी खेळात सहभाग घेतात तेच विद्यार्थी भावी आयुष्यात राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दमदार व चमकदार कामगिरी करतात पदक म्हणजे नुसता धातूचा बिल्ला नसून यशस्वी पराक्रमाची साक्ष देणारा व क्रीडा जगतात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा इतिहास असतो पदक म्हणजे आपल्या शौर्यची गाथा असते असे प्रतिपादन विद्यार्थ्याच्या कौतुक गौरव सोहळ्यात सीमाताई पाटील यांनी केले
…कार्यक्रमाला साहित्यिक श्रीधर बच्छाव. शुभम कचरे.नितीन दांडगे .भूषण पितांबरे . किशोर आरके.दीपक उचित. प्रदीप शेळके. अमोल राऊत.गणेश काटोले प्रदीप कूदळे .विशाल भोसले .सोमिनाथ मोरे .दत्ता शिंदे.राजू शेख.अनिता रोडगे .गंगासागर मुटकुळे.अर्चना बोरडे.ज्योती इंगळे.दीपाली लक्कस .राणी जगताप.मंजू शिंदे रमा काळे .इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.
