राजकियराज्य

शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य गुढीपाडवा मेळावा उत्साहात

तरुणांना मैदानात उतरून संघर्ष करण्याचे आवाहन

शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य गुढीपाडवा मेळावा उत्साहात

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क 

यंदाही दरवर्षीप्रमाणे दादरच्या ऐतिहासिक शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य गुढीपाडवा मेळावा उत्साहात पार पडला. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे यांची ही पहिलीच मोठी जाहीर सभा असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले होते. अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत सद्यस्थितीवर भाष्य करत राज्यातील तरुणाईला वास्तवाची जाणीव करून दिली.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, राज्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे आणि संपूर्ण राज्य कर्जाच्या विळख्यात अडकले आहे. शहरांची दुरवस्था झाली आहे आणि युवक व्हर्च्युअल जगात अडकले आहेत.

कोस्टल रोडबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, तो रस्ता मुंबईत सहज येण्यासाठी आणि लोकांना मुंबईच्या बाहेर काढण्यासाठी आहे. ते म्हणाले की, “आम्ही फक्त मोबाईलवर व्यक्त होतोय!” आणि तरुण पिढी सोशल मीडियापुरती मर्यादित राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरही चिंता व्यक्त केली आणि तरुणांना मैदानात उतरून संघर्ष करण्याचे आवाहन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close