
खेळ म्हणजे बौद्धिक क्षमता वाढवण्याचे टॉनिक -अजिंक्य पाटील
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था
पूर्णा कावेरी शिक्षण संस्था सिल्लोड संचालित स्वामी विवेकानंद विद्यालय व रामेश्वर इंग्लिश स्कूल या शाळेत शालेय अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिक्षणप्रेमी आदरणीय अजिंक्य पाटील सर व प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ .आशीष पाटील सर व डॉ .सिमाताई पाटील यांच्या हस्ते मशाल पेटवून उद्घाटन करण्यात आले.
व्यासपीठावर मुख्याध्यापिका अरुणा सोनवने प्रिन्सिपल जगदीश कापुरे यांची उपस्थिति होती.
आपल्या अध्यक्षीय भाषणात अजिंक्य पाटील सर म्हणालेत की, खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक असून विद्यार्थ्यानी खेळात सहभाग घेणे आवश्यक आहे खेळामुळे मानसिक व शारिरीक विकास होतो जे विद्यार्थी शालेय जीवनात खेळात सहभाग घेतात त्यांना भविष्यात कोणतेही आजार उदभवत नाहीत खेळ म्हणजे निरोगी जीवन जगण्याचे टॉनिक आहे खेळामुळे मैत्री व प्रेमभाव वाढीस लागतो असे प्रतिपादन अजिंक्य पाटील यांनी केले.
कार्यक्रमाला साहित्यिक श्रीधर बच्छाव. शुभम कचरे. अमोल राऊत. दीपक उचित. प्रदीप शेळके. नितीन दांडगे. भूषण पिंताबरे. प्रदीप कूदळे. सोमीनाथ मोरे. दत्ता शिंदे. गणेश काटोले. मुकेश आरके. विशाल भोसले अनिता रोडगे. गंगासागर मुटकुळे. रानी जगताप अर्चना बोरडे. मंजू शिंदे. इत्यादि कर्मचारी उपस्थिति होती.
