जबरीने मोबाईल हिसकवानारे 02 आरोपीतांना MIDC वाळुज पोलीसांनी केली अटक
1,35,000/- रुपये किंमतीचे दोन मोबाईल व मोटर सायकल केली जप्त

जबरीने मोबाईल हिसकवानारे 02 आरोपीतांना MIDC वाळुज पोलीसांनी केली अटक
1,35,000/- रुपये किंमतीचे दोन मोबाईल व मोटर सायकल केली जप्त
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी राजू जंगले वाळूज छ्त्रपती संभाजीनगर
दिनांक 24/03/2025 रोजी फिर्यादी नामे दिपेश शिवाजी सुर्यवंशी वय 34 वर्ष रा. डोंबिवली कंभारपाडा मुंबई यांनी पो.स्टे.ला तक्रार दिली की, दिनांक 23/03/2025 रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास फिर्यादी हे कार्यक्रम संपून ओअॅसीस चौक पंढरपूर येथे हातात मोचाईल घेवून थांबले असता सदर ठिकाणी एका मोटार सायकलवर तिन ईसम आले. त्यातील सर्वात पाठीमागे बसलेल्या इसमाने इसमाने जबरदस्तीने फिर्यादीच्या हातातील 55,000/- रुपये किंमतीचा 100012 कपंनीचा मोबाईल हिसकावून पळून गेले म्हणून पो.स्टे.ला गु.र.नं. 266/2025 कलम 309(4) भा.न्या संहिता 2023 प्रगाणे गुन्हा दखल झालेला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि गणेश गिरी, हे करत आहेत.
सदरील गुन्हा घडल्याची माहिती पो.स्टे.ला प्राप्त होताच रामेश्वर गाडे बरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शना प्रमाणे पो.स्टे.चे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळावरील तांत्रीक पुरावे हस्तगत करून आरोपीची नावे निष्पण केले. आरोपीतांचा शोध घेतला असता आरोपी नामे ।) आशिष रमेश गवई वय 23 वर्ष, 2) मनोज सुखदेव शिंदे वय 21 वर्ष धंदा मजुरी दोघे रा. काचिपुरा झोपडपट्टी छत्रपती संभाजीनगर यांना दिनांक 24/03/2025 रोजी राजी 02.00 वाजताच्या सुमारास वाळूज महानगरकडे जाणाऱ्या पाईलाईन रोडवर ताब्यात घेवून त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात 55,000/- दोन मोबाईल हॅण्डसेट, 80,000/-रु. किंतीची होडाशाईन मोटर सायकल मिळून आली. त्याबाबत आरोपीतांना विचारपूस केली असता त्यांनी काही एक समाधान कारक उत्तर दिले नाही. त्यावरून त्यांच्या ताब्यात मिळालेले मोबाईल व दुचाकी चोरीची असल्याचा संशय बळावला त्यावरून त्यांना नमूद गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यात मिळून मोटर सायकल क्रमांक MH 20 HC 9028 होंडा शाईन ही चोरीची असल्याचे निष्मण झाले. फिर्यादी नामे अशोक शंकरराव गवळे वय 53 वर्ष रा.हसूल ता.जि.छत्रपती संभाजीनगर यांना दिनांक 22/03/2025 रोजी संध्याकाळी 07.30 वाजताच्या सुमारास योरोंक कंपनी आकारटूलच्या जवळ रांजनगांव फाटा, येथे आडवून फिर्यादीस ढकलून देवून बळजबरीने हिसकावून अनोळखी तिन इसमांनी गाडी चोरी करून घेवून गेले म्हणून दिलेल्या तक्रारीवरून पो.स्टे.ला गु.र.नं. 272/2025 कलम 309(4), 3(5) BNSS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्हयातील चोरी झालेली मोटर सायकल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली आहे. नमूद आरोपीतांनकडून मोबाईल चोरीचे व मोटर सायकल चोरीचे इतर गुन्हे उघडकीन येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी ही प्रविण पवार, पोलीस आयुक्त, मा. पोलीस उप आयुक्त श्री नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सपोनि मनोज शिंदे, पोउपनि गणेश गिरी, मपोउपनि / भाग्यश्री शिंदे, पोह/बाळासाहेब आंधळे, पोअं/यशवंत गोवाडे, नितीन इनामे, गणेश सागरे, समाधान पाटील, श्रीकृष्ण कांबळे, राजाभाऊ कोल्हे यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.
