राजकिय
जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल
गंगापूर:प्रतिनिधी:विशाल जोशी
गंगापूर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

प्रारंभी गंगापूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते, सामान्य नागरीक व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
शिस्तबद्ध व शांततेत निघालेल्या या रॅलीत आ.सतीश चव्हाण यांनी शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
रॅली दरम्यान जवळपास पाच-सहा किलोमीटर गंगापूर शहरातील मुख्य रस्त्यावर मोठी गर्दी होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केलेले हे शक्तिप्रदर्शन पाहून आज प्रत्यक्ष दर्शीना गंगापूर मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे, अशी चर्चा रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहून स्पष्टपणे जाणवत होता.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पहिल्यांदाच इतकी मोठी गर्दी जमा झाल्याचे लोकं बोलत होते, अशी विक्रमी गर्दी होणे हे आ.सतीश चव्हाण यांच्यासाठी अश्वासक वातावरण निर्माण झाल्याचे सिद्ध करते. या गर्दीने विरोधकांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे, हे ठळकपणे जाणवत होते. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या पक्षाचे कार्यकर्ते
मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. रॅली पाहण्यासाठी गंगापूर शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी रस्यावर केली होती.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री राजेश टोपे, जेष्ठ नेते सुधाकर सोनवणे, काँग्रेसचे जेष्ठ नेते जगन्नाथ खोसरे, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मणभाऊ सांगळे, त्रिंबक तुपे, डॉ. नरेंद्र काळे, पांडुरंग तांगडे पाटील, संजय जाधव, राजू वरकड, दिनेश मुथा, अंकुश काळवणे, अनिल चव्हाण, संपत छाजेड, अनिल जाधव, संजय जैस्वाल, विश्वजीत चव्हाण, आयुब पटेल, जनार्धन रोडगे, महेश उबाळे, रमेश निचित, अर्चना सोमासे, मच्छिंद्र देवकर, राजू पाटील डोणगावकर, मोहसीन चाऊस, एस एस खमर, नासेर पटेल, रावसाहेब तोगे, प्रवीण नीतनवरे, नितीन कांगुने, मारोती साळवे, लक्ष्मण पाटील प्रधान, अशोक गायकवाड, राजू पठाण, अनिता बोरसे, गजानन फुलारे, विमलबाई जगताप, योगेश पाटील, सुरेश नेमाडे, आयुब पटेल, तुकाराम सटाले, सोपान देशमुख, नदीम शेख, वाजेद शेख आदींसह राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस व महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचे कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.
