
खानवटे येथे भरला चिमुकल्यांचा आनंदी बाजार
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज दौंड प्रतिनिधी (प्रा. सुनिल नगरे )
खानवटे येथील न्यू दुर्गामाता सेमी इंग्लिश स्कुल मध्ये दि. 23 जानेवारी रोजी चिमुकल्यांचा आनंदी बाजार व खाऊगली उपक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला.
या उपक्रमाचे उदघाटन न्यू दुर्गामाता शिक्षण संस्थेचे संचालक व खानवटे गावचे माजी सरपंच रंगनाथ पवार यांनी केले.
या आनंदी बाजारात चिमुकल्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला, फळभाज्या, फळे, विविध प्रकारची खाद्ये , फुलझाडे, स्टेशनरी तसेंच वेगवेगळ्या वस्तू विकायला आणल्या होत्या. गावातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने या उपक्रमाला खऱ्या खुऱ्या बाजाराचे रूप दिसून आल्याचे पाहावयास मिळाले.
” असे उपक्रम शाळेत झाल्याने मुलांना एक प्रकारचे व्यवहारीक ज्ञान मिळते तसेंच नफा-तोटा, देवाण – घेवाण यांची माहिती मिळते. आजच्या मोबाईल युगात चौकटीबाहेरील असे व्यवहार ज्ञान मुलांना मिळणे खूप महत्वाचे आहे ” असे मत यावेळी प्रवीण कोरे व पद्मसिंह भोसले यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी रंगनाथ ढवळे, निलेश झोंड, अमोल जगदाळे, अभयसिंह राजेभोसले,नितीन पतुरे,हनुमंत भोसले, विठ्ठल पतुरे,विजय पोटफोडे,तुषार झोंड,सोमनाथ पोटफोडे,रवींद्र गुरव, भगवान भोसले, प्रवीण कदम, योगेश शिर्के तसेंच महिला वर्गातून सारिका गायकवाड,प्रियंका लोखंडे, अर्चना गुरव, रुपाली चांदगुडे व शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
