पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
पुण्यात येलो तर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज सकाळच्या घडामोडी
▪️पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; पुण्यात येलो तर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
▪️तब्बल 33 देशात पाकिस्तानी दहशतवादाचा बुरखा फाडणार, 59 जणांच्या जम्बो शिष्टमंडळात 51 खासदार 8 राजदूत
▪️शरद पवारांच्या पक्षापेक्षा अन् शिंदे गटापेक्षा आमचे जास्त खासदार; तरीही शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी नाही, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
▪️सोलापूर एमआयडीसीतील टॉवेल कारखान्याला भीषण आग, कंपनीच्या मालकासह एकूण 8 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 3 कामगारांचा समावेश
▪️महाराष्ट्रातील 7 खासदार ठरले संसदरत्न; सुप्रिया सुळेंसह काँग्रेस, शिवसेनेचे खासदारही ठरले संसदरत्न पुरस्काराचे मानकरी
▪️अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर सांगली, कोल्हापुरात नक्षलवादी तयार होतील; खासदार धैर्यशील मानेंचं चक्काजाम आंदोलनात वक्तव्य
▪️शपथ घेतल्यानंतर पहिलाच महाराष्ट्र दौरा, सरन्यायाधीश भूषण गवईंची उघडपणे नाराजी; प्रोटोकॉल पाळायला DG, पोलीस आयुक्त, मुख्य सचिव धावत-पळतच आले
▪️अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मुंबई महापालिकेची नोटीस; बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप, अभिनेत्याकडून उत्तर पाठवलं जाणार
▪️विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावरील विश्वास वाढला, मे महिन्यात तिजोरी उघडली, तीन आठवड्यात हजारो कोटींची गुंतवणूक
▪️ गुजरात, आरसीबी अन् पंजाबची थाटात प्लेऑफमध्ये एंट्री; चौथ्या स्थानासाठी रंगणार शर्यत
