
फुलंब्री चा बालेकिल्ला कायम अनुराधाताई चव्हाण यांचा विजय
साक्षर इंडीया लाईव्ह न्यूज फुलंब्री प्रतिनिधी:अमोल कोलते
फुलंब्री: विधानसभा १०६ मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार अनुराधा चव्हाण व महाविकास आघाडी चे विलास औताडे यामध्ये मोठी लढत पहायला मिळाली यामध्ये अनुराधा ताई चव्हाण यांना जनतेनी 135046 मते देऊन विजयी केले आहे.
फुलंब्री मध्ये मतदारसंघात नागरीकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले तसेच या भागातील हजारो लाडकी बहीणीनी सुध्दा मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला – निवडून आल्यावर मोठ्या प्रमाणात फटाक्याची आताषबाजी,व पेढे वाटुन आनंद व्यक्त केला.
यावेळी मतदार बंधू भगिनींना मला मतदान रुपी आशीर्वाद दिला असे यावेळी अनुराधा ताई चव्हाण यांनी बोलताना सांगितले.फुलंब्री भाजप चा बालेकिल्ला कायम राहीला. यावेळी भाजप शिवसेना महायुतीचे सर्व सेल, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला.
