देवगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
खेळाडूंना कनिष्ठ क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक राकेश खैरनार प्रा.शुभम गवळी यांनी मार्गदर्शन केले तर मंगल शिंदे ,प्रा.कृष्णा दाभाडे प्रा. अमोल पगारे ,श्री.शेख शफीक यांचे सहकार्य लाभले.

देवगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
यवतमाळ येथे झालेल्या आंतरशालेय 17 वर्षे आतील मुलांच्या बास्केटबॉल संघाने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये देवगिरी महाविद्यालयाच्या संघाने विविध विभागातील संघांना नमावुन पुन्हा एकदा आपला ठसा उमटत संघाने तिसरा क्रमांक पटकावला सलग दुसऱ्या वर्षी सर्वांची मक्तेदारी तोडत देवगिरी महाविद्यालयाचा संघ राज्यात पहिल्या तीन मध्ये आला आहे
या संघात आदित्य खांडेकर अंशुमन सिंग ,अंगद बाहेकर, राज मालकर, हर्षित लाटे ,शंतनु रवी, योग श्राफ ,युवराज कारवा ,प्रियांशु सिंग, युवराज वाघ, अर्णव अग्रवाल, आयान शेख या खेळाडूंचा समावेश आहे याप्रसंगी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, स्थानिक नियमक मंडळाचे सदस्य माननीय मा.पंडितराव हर्षे ,कार्यकारणी सदस्य मा.त्र्यंबकराव पाथरीकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक तेजनकर उपप्राचार्य प्रा.एन.जी.गायकवाड उपप्राचार्य प्रा.सुरेश लिपाने उपप्राचार्य प्रा.विजय नलावडे या सर्व मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच या खेळाडूंना कनिष्ठ क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक राकेश खैरनार प्रा.शुभम गवळी यांनी मार्गदर्शन केले तर मंगल शिंदे ,प्रा.कृष्णा दाभाडे प्रा. अमोल पगारे ,श्री.शेख शफीक यांचे सहकार्य लाभले.
