राजकियराज्यसामाजिक

जिल्हा परिषदेवर वडखा येथील महिलांचा हंडा मोर्चा 

महिला गावकरी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेवर वडखा येथील महिलांचा हंडा मोर्चा 

साक्षर इंडीया लाईव्ह न्यूज प्रतिनिधी:अमोल कोलते फुलंब्री छ.संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर येथील वडखा हनुमान नगर येथील एम.आय.डी.सी. येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजना, पाणीपुरवठा विभाग, जि.प. छत्रपती संभाजीनगर च्या वतीने पिण्याच्या पाण्याचे पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु होते. काही अडचणींमुळे सदर काम आठ महिने रेंगाळले असुन निवेदनात म्हटले आहे की तक्रार अर्ज देवून अजुन‌ पर्यंत दखल न घेतलया मुळे महिला समवेत हंडा मोर्चा घेऊन आपल्या कार्यालयाने सदरील काम चालू करावेत परंतु जवळपास सहा महिन्यापासून सदरील काम बंद केले आहे. याबाबत अनेक वेळेस कार्यालयात जावून तोंडी कळविले आहे. परंतु त्यांनी काहीही दखल घेतलेली नाही.

सदरील ठेकेदार हे काम करण्यास हलगर्जीपणा करत आहेत व संबंधित अधिकारी हे ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करत असून, संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात असे वेळोवेळी निवेदनाद्वारे कळवूनही अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही यासाठी प्रहार चे आज जिल्हा परिषद कार्यालय येथे गेट समोर हडा मोर्चा काढुन शासनाचे डोळे उघडले.

यावेळी अधिकारी यांनी लवकरात लवकर चालु करणार असे आश्वसन दिले आहे.आंदोलन मागे घेतले. जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे,शहराध्यक्ष कुणाल राऊत ,युवा जिल्हा अध्यक्ष कृष्णा गाडेकर, तालुका अध्यक्ष शिवाजी काकडे , तालुकाध्यक्ष रामू काका पठाडे , कार्याध्यक्ष अमोल कोलते ,राम गाडेकर, विजू साबळे राजेश जैस्वाल , निर्मला बोडके कविता साबळे, मनिषासाबळे, प्रियंका गायकवाड ,पार्वती सोनवणे सागर काकडे ,कालींदा काकडे भीमाबाई काकडे ,मनकरणा बाई काकडे ,अनिता काकडे ,कमल शिंदे रेखा काकडे ,प्रमिला बोडके ,छाया काकडे ,कासाबाई काकडे ,जनाबाई काकडे आदी महिला गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close